मुंबई : एसटी महामंडळाने नुकसान कमी करण्यासाठी ५०० खासगी साध्या गाड्या भाड्याने घेण्याचा घाट घातला आहे. आगारांकडून त्यासंदर्भातली माहिती मागवण्यात येत असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनांनी केला आहे. तसेच या साध्या खासगी गाड्या एकाही फलाटाला लागू देणार नाही, असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे.
राज्यातील विविध आगारांना एसटी महामंडळाच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाने पत्रे पाठवली असून २५० ते ३०० किमी अंतराचे मार्ग, इतर गाड्यांना थांबवण्यासाठी डेपोत असलेली जागेची उपलब्धता याची माहिती मागवली आहे. महामंडळाने शिवशाहीप्रमाणेच या खासगी गाड्या भाड्याने घेण्याचा प्रयत्न चालवला असून यास आमचा विरोध असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
शिवशाही गाड्या महामंडळाने खासगी तत्त्वावर भाड्याने घेतल्या होत्या. त्याचे अपघात इतके झाले की त्याने महामंडळाची बदनामी झाली. तोच प्रकार पुन्हा महामंडळ करत आहे, असा आरोप कामगार संघटनांचा आहे. गेली ५० वर्षे महामंडळाची लाल गाडी विविध मार्गांवर धावत आहे, त्या जागी आम्ही खासगी गाडी येऊ देणार नाही. या निर्णयाविरोधात आम्ही महामंडळास पत्र पाठवले आहे, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले. दीर्घ पल्ल्याच्या मार्गावर या गाड्या चालवण्याचे प्रयत्न सुरू असून याचे उत्पन्न खासगी गाड्यांना मिळेल. मग महामंडळाचा तोटा कमी कसा होणार, असा प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही आमचा अपमान करत आहात’, संजय राऊतांचा राज्यपालांच्या भूमिकेवर संताप
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

