Share

अतुल भातखळकरांना लाज वाटली पाहिजे; हसन मुश्रीफांनी झापलं !

Published On: 

कोल्हापूर : तोक्ते चक्रीवादळाची सूचना मिळूनही ओएनजीसीने दुर्लक्ष केले आणि ७०० कामगारांचा जीव धोक्यात घातला त्यामुळे ३७ कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ओएनजीसी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन जो कोणी दोषी असेल त्यांना जबाबदार ठरवून शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच सरकार आल्यापासून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अनेक प्रकारणांवरून हल्लाबोल केला आहे. आता त्यांनी मलिकांच्या या मागणीवर सडकून टीका केली. नवाब मलिक यांचं मानसिक संतुलन बिघडलंय अशी टिप्पणी केली होती. आता राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भातखळकरांना दिलं आहे.

‘अतुल भतखळकरांना लाज वाटली पाहिजे. इतके लोक मृत्यूमुखी पडले असताना ते या कंपनीचे एजंट आहेत की वकील आहेत ज्यामुळे नवाब मलिकांवर टीका करत आहेत. त्यामुळे भाजपाच्या सत्ता गेलेल्या अस्वस्थ लोकांचंच मानसिक संतुलन बिघडलं आहे,’ अशा शब्दांत मुश्रीफांनी भातखळकरांना सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!