Share

‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पंतप्रधान मोंदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, केरळ, ओदिशा, पुद्दुच्चेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी आणि काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या दरम्यान या राज्यांचे मुख्यमंत्री देखील या ऑनलाईन चर्चेत सहभागी झाले होते.

कोरोना संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये विविध राज्यांचा अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र पश्चिम बंगालच्या एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हजर होत्या.  पण बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत, मुख्यमंत्र्यांना बोलण्यास परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘जर राज्यांना बोलण्याची परवानगी नव्हती तर त्यांना का बोलावण्यात आलं? बोलण्यास परवानगी न देण्यात आल्याबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी निषेध नोंदवायला हवा.’

‘केंद्राकडे ना कोणतं धोरण, ना कोणती उपाययोजना, असं असूनही बिगर भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही, असा आरोप केला. मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिलं नाही. पण भाजपचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं ना’ असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!