Share

पृथ्वी शॉला आगामी विश्वचषकात खेळवायला हवे, आकाश चोप्राने केली मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतातील आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने अर्ध्यातच स्थगित केली. या स्पर्धेनंतर काही दिवसातच बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र संघात भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉला पुन्हा डावलले गेले. यानंतर अनेक क्रिकेटपटूनी याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

यात आता भारताचा माजी क्रिकेटपटु आकाश चोप्राचे नाव जोडले गेले आहे. आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना आकाश म्हणाला की,’गेल्या काही दिवसात पृथ्वी शॉने ज्याप्रकारे कामगिरी केली त्याप्रकारे त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चुकिचे ठरेल. पृथ्वी शॉला आगामी टी-२० विश्वचषकात भारतीय संघात स्थान दिले पाहिजे असे मला वाटते.’ यावेळी बोलताना आकाश चोप्राने आयपीएल पृथ्वी शॉच्या फलंदाजीचे कौतुक केले.’ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खराब कामगिरीनंतर पृथ्वी शॉला भारतीय संघातून वगळण्यात आले होते.

मात्र यानंतर पृथ्वी शॉने स्वत:मध्ये सुधारणा करत विजय हजारे करंडक स्पर्धेत धडाकेबाज कामगीरी केली. आणि मुंबईच्या जेतेपदात सिंहाचा वाटा उचलला. यानंतर आयपीएल २०२१ स्पर्धेत त्यांने त्याचा शानदार फॉर्म कायम ठेवला. आयपीएल स्पर्धेत ८ सामन्यात पृथ्वीने ३८च्या सरासरीने ३०८ धावा केल्या. यात त्याने ८२ धावांची सर्वेोत्तम खेळी केली. जुलै महिन्यात आगमी श्रीलंका दौऱ्यात पृथ्वीला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!