Share

मानवी स्वभावाची संवेदनशील नात्याची गोष्ट सांगणारा ‘जुन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन यांचा अभिनय असलेला ‘जुन’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी माध्यमातुन हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मचा पहिलाच चित्रपट ‘जुन’ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे सुह्रद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे. या चित्रपटात नेहा पेंडसे, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहे. निखील महाजन यांनी या चित्रपटाचे लेखन केलं आहे. या चित्रपटासाठी जितेंद्र जोशी यांनी गीत लिहीले आहे.

तर गायीका शाल्मली खोलगडे या चित्रपटाच्या माध्यमातून संगीतकार म्हणून पदार्पन करणार आहे. ‘जून’ या चित्रपटाची निर्मिती सुप्री मीडियाचे शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे-बायस आणि ब्लू-ड्रॉप प्रायवेट लिमीटेडचे निखिल महाजन आणि पवन मालू यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. निखिल महाजन या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. ‘जून’ चित्रपटाची ५१ व्या इफ्फी मधल्या इंडियन पॅनोरोमा या विभागात निवड झाली होती. तसेच पुणे फ़िल्म फ़ेस्टिवल, केरळ फिल्म फेस्टिवल आणि  न्यूय़ॉर्क फ़िल्म फेस्टिवलमध्ये जूनची निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!