🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील राणू आक्का साहेब यांच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेकांच्या मनात जागा निर्माण केली. सध्या अश्विनी स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. आशातच आता अश्विनी महांगडेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच तिच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रदीप कुमार महांगडे यांचा नेहमीच राजकारण, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग असायचा. गेल्या काही दिवसांपासून त्यांना भोर, पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु आज अखेर सर्वांचे लाडके प्रदीपकुमार महांगडे यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्यावर भोर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने दोन वर्षांपूर्वी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली असून या माध्यमातून तिने अनेक गरजूंना मदत केली आहे.कोरोनाच्या संकटात रुग्णांना बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नाही. अशा परिस्थितीत रुग्णांची आणि पर्यायाने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची जेवणाशिवाय हेळसांड होऊ नये यासाठी अश्विनी महांगडे आणि रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. यामध्यमातून ती सामाजिक कार्य करत आहे सामाजिक कार्याचा वारसा तिला तिच्या वडिलांकडुनच मिळाला.
महत्वाच्या बातम्या
- १९ मे रोजी प्रदर्शित होणार ‘फॅमिली मॅन २’चा ट्रेलर; अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची घोषणा
- एबीचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन नाहीच; दक्षिण अफ्रिका बोर्डाने केले स्पष्ट
- ‘कोरोनाचा हाहाकार ; केंद्र व राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?’
- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, दररोज भागवताय शेकडोंची भूक!कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट

