मुंबई : देशात सद्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट आल्याने लॉकडाउन करण्यात आले आणि सर्व काम ठप्प झाले. मात्र या परिस्थितीमध्ये देखील आपल काम चोखपणे बजावत आहे तर म्हणजे पोलीस. अगदी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत काम करत आहेत. प्रत्येक संकटाला खंबीरपणे आणि सर्व नागरिकांची रक्षा करण्यासाठी उभे आहेत. असाच एक कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांचा व्हिडीओ अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CPASwlXDqlP/?utm_medium=copy_link
प्राजक्ता माळीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे, असं म्हणत तिने पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोणत्याही संकटात मुंबई पोलीस नेहमीच खंबरपणे उभे राहून लोकांची सेवा करत आहेत. प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भर पावसात मुंबई पोलीस आपलं कर्तव्य बजावताना दिसतात. या मुसळधार पावसात त्यांच्याकडे छत्री किंवा रेनकोट देखील नाही तरी देखील कोणतीही पर्वा न करता ते आपलं कर्तव्य बजावत आहेत.
पोलिस नेहमीच आपल्या कर्तव्यात कोणतीही कसर न ठेवता दिवस रात्र काम करतात. ऊन, पाऊस, वारा याची पर्वा न करता ते कर्तव्यदक्ष असतात. मात्र अनेकदा याच पोलिसाना काही लोक चुकीची वागणूक देतात. या कोरोनाच्या स्थितीत देखील शिस्त लावण्याचे उत्तम काम ते नागरिकांच्या सुरक्षेसाठीच करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- एबीचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन नाहीच; दक्षिण अफ्रिका बोर्डाने केले स्पष्ट
- ‘कोरोनाचा हाहाकार ; केंद्र व राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?’
- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, दररोज भागवताय शेकडोंची भूक!
- कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट
- ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती…’


