Share

‘गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करणारे पंतप्रधान महाराष्ट्राचा दौरा का करत नाहीत?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दिवला भेट देऊन तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे. भावनगर, उना, दिव,जाफराबाद आणि महूआ या भागाची हवाई पाहणी देखील पंतप्रधान करणार असून अहमदाबाद इथं आढावा बैठक घेणार आहेत.

दरम्यान तौक्तेमध्ये गुजरातमधील २७ जणांनी जीव गमावल्याचे वृत्त आहे. गुजरातमधील किनारी भागात या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून, इथले वीजेचे खांब, मोठाले वृक्ष आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय इथल्या रस्त्यांचेही नुकसान झाल्यी माहिती समोर येत आहे.

तौक्ते चक्रीवादळामुऴे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडले आहेत. घराचं नुकसान झालं आहे. दरम्यान, आता मोदींच्या दौऱ्यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. मोदींच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीने टीका केली असून महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबद्दल असलेल्या या भेदभावाबद्दल नवाब मलिक यांनी ट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!