Share

मोदी आज गुजरात दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची करणार हवाई पाहणी

Published On: 

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दिवला भेट देऊन तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे. भावनगर, उना, दिव,जाफराबाद आणि महूआ या भागाची हवाई पाहणी देखील पंतप्रधान करणार असून अहमदाबाद इथं आढावा बैठक घेणार आहेत.

दरम्यान तौक्तेमध्ये गुजरातमधील २७ जणांनी जीव गमावल्याचे वृत्त आहे. गुजरातमधील किनारी भागात या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून, इथले वीजेचे खांब, मोठाले वृक्ष आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय इथल्या रस्त्यांचेही नुकसान झाल्यी माहिती समोर येत आहे.

तौक्ते चक्रीवादळामुऴे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडले आहेत. घराचं नुकसान झालं आहे. फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी जवळपास 40 हजार झाडे आणि 16,500 हून अधिक घराचं नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी देखील  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!