मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये राज्यातील राजकारण काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सातत्याने केंद्रावर आरोप करत असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसापासून पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. ‘आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. आतातरी ही सवय सोडा., कधी तरी आत्मचिंतन करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आघाडी सरकारला दिला आहे.
आपत्ती कोणत्याही एका पक्षाची नसते. आपत्तीत सर्वांनी मिळून काम करायचं असतं,चांगलं झालं आपली पाठ थोपटून घेतात. पण त्यात काही उणीव दिसली की लगेच केंद्राकडे बोट दाखवतात. राज्य सरकारचं असं वागणं बरं नाही, असा चिमटा देखील त्यांनी काढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तशी’ यंत्रणा असती तर पवारांनी उजनी धरणच बारामतीला नेलं असतं; शिवसेना आमदाराची बोचरी टीका
- ‘…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा’; शिवसेना आमदाराचाच ठाकरे सरकारला इशारा
- गंगेत मृतदेह टाकण्यापासून रोखा आणि सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करा; केंद्राचे राज्यांना निर्देश
- अभिनेत्री राखी सावंत आता दिसणार हॉलीवूडमध्ये ?
- कोरोनाचे हॉटस्पॉट असूनही ‘या’ गावात नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
