सांगोला : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी झाली आहे. इंदापूरकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात धडकल्या आणि याच निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
सोलापुरातील भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर महाविकास आघाडी पक्षातील नेत्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. पालकमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तर, आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनीच यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी पाटील यांनी देखील उजनीचे पाणी इतरत्र वळवण्याला तीव्र विरोध केला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.
‘राज्यात ज्या ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचाराचे सरकार आले तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आह हे देशभर सांगायचं ही पवारांची पद्धत आहे. शरद पवार राज्याचे नेते पण फक्त बारामतीचा विकास केला,’ असा घणाघात शहाजी पाटील यांनी केला.
पुढे ते म्हणाले, ‘उजनी धरणातून शरद पवारांनी बारामती एमआयडीसी, बारामती शहर आणि सिनर्मास प्रकल्पाला पाणी नेलं. एवढं पाणी देऊनही शरद पवारांना पाणी कमी पडतंय असं वाटत आहे. उजनी धरणच बारामतीला वळवण्याची काही यंत्रणा असती तर ते धरण सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं.’
महत्त्वाच्या बातम्या
- कोण कुठून काम करतोय हे महत्वाचे नाही, तर…; आव्हाडांच भाजपला प्रत्युत्तर
- ‘…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा’; शिवसेना आमदाराचाच ठाकरे सरकारला इशारा
- गंगेत मृतदेह टाकण्यापासून रोखा आणि सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करा; केंद्राचे राज्यांना निर्देश
- अभिनेत्री राखी सावंत आता दिसणार हॉलीवूडमध्ये ?
- कोरोनाचे हॉटस्पॉट असूनही ‘या’ गावात नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
