मुंबई : अभिनेत्री राखी सावंत हिची साधारण ओळख ‘ड्रामा क्वीन’ म्हणून आहे. तिच्या या ड्रामेबाजपणामुळे तिला अनेकांकडून चांगलेच सुनावले जाते. राखी सावंत सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच स्वतःचे फोटो, व्हिडीओ अपलोड करत असते. तिने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती हॉलीवूडमधील ऍक्ट्रेसच्या गेटअपमध्ये दिसते आहे. आपण लवकरच हॉलीवूडमध्ये जाणार असल्याचे राखीने या व्हिडीओतून सांगितले आहे.
https://www.instagram.com/p/CO5CGjBn5CY/?igshid=1uuhnh5627ab4
इन्स्टाग्रामवरचा तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नीट बघितल्यावर राखीची ड्रामेबाजी लक्षात येते. हॉलीवूडमधील गाजलेल्या ऍक्ट्रेसने साकारलेल्या रोलच्या व्हिडीओमध्ये राखीने स्वतःचा चेहरा डीपफेक ऍनिमेट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नर्सच्या रोल मध्ये असल्याचे दिसत आहे. राखी नेहमीच फेसऍप आणि रिफेस व्हिडीओ करून ते शेअर करत असते. तिने यापूर्वीही हॉलीवूडमधील कलाकारांच्या रोलमध्ये स्वतःचा चेहरा वापरून ते व्हिडीओ शेअर केले होते.
तिने शेअर केलेल्या हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी तिला हॉलीवूडमध्ये काम करावे असे सुचवले आहे. तर काही जण तू यामध्ये सुंदर दिसत आहे असे कमेंट्स केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने’ देश चालवता येत नसेल तर राजीनामा द्या आणि सोनू सूद किंवा सलमान खानला पंतप्रधान करा. ‘ अस म्हंटली होती. या विधानामुळे देखील तिला सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. तिच्या या ड्रामेबाजपणामुळेच ती सतत ट्रोल होत असते.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवस विशेष ‘अग्निहोत्र’ मधील ‘मंजुळा’ ते ‘बंदीशाळा’तील ‘जेलर’ मुक्ता बर्वेचा थक्क करणारा प्रवास
- ‘बॉल टेम्परिंग बद्दल गोलंदाजांना माहित होते’ ; बॅनक्रॉफ्टच्या विधानावर माजी ऑस्ट्रेलियन कर्णधारचा धक्कादायक खुलासा
- करण जोहरच्या मुलांनी केली पावसाळ्याची तयारी; सोशल मिडियावर पोस्ट केला फोटो
- उस्मानाबादेत ऑक्सिजन पुरवठा होतोय सुरळीत
- ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटामुळे संजय लीला भन्साळी यांना दिवसाला ३ लाख रुपयांचा होतोय तोटा


