Share

कोरोनाचे हॉटस्पॉट असूनही ‘या’ गावात नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच त्यात आता म्युकरमायकोसीस हा आजार सुद्धा पसरत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा काही नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचे दिसत आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असतानाही भूम तालुक्यातील पाथरुड येथे काही व्यापारी व युवकांकडून बेजबाबदारपणाचे वर्तन घडत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला होता.

पाथरूडमध्ये कोरोना महामारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाथरूड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आतापर्यंत १०६ बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी २८ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. पाथरूड कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. असे असतानाही अनेक व्यक्तींकडून अद्यापही नियमांचे उल्लंघन होत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे. गावातील काही व्यापारी नियमाचे पालन करीत नाहीत. किराणा दुकान, फळाचे दुकाने तर काही ठिकाणी चहाचे हॉटेल उघडे ठेवण्यात येत आहेत. यामुळे संबंधित दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यातून आणखी संसर्ग वाढत आहे.

ग्रामपंचायतच्या वतीने सातत्याने जनजागृती व आवाहन करूनही या व्यावसायिकांकडून नियमाचे पालन केले जात नाही. हा सर्व प्रकार शनिवारी राऊंड मारत असताना तहसील पथकाच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने फळविक्रेते व हॉटेल व्यवसायावर प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला. कारवाई सुरू झाल्याची माहिती समजताच अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली. तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायती कार्यालयाने दंड करण्याची कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!