सांगोला : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी झाली आहे. इंदापूरकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात धडकल्या आणि याच निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
सोलापुरातील भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर महाविकास आघाडी पक्षातील नेत्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. आता सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी रक्तरंजित लढाईला तयार राहा, असा आक्रमक इशाराच ठाकरे सरकारला दिला आहे. आमदार पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी त्यांनी देखील उजनीचे पाणी इतरत्र वळवण्याला तीव्र विरोध केला आहे.
‘सोलापूरमधील लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून अचानकपणे महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सोलापूरला सिंचनासाठी इतर कोणत्याही धरणावर अवलंबून राहता येणार नसल्याने उजनी हेच जिल्ह्याचा आणि शेतकऱ्यांचा प्राण आहे. त्यामुळे हे अन्यायकारक असून शिवसेना आमदार म्हणून सर्व शक्ती पणाला लावणार असून कायदेशीर लढाई लढू आणि रक्तरंजित लढाईला तयार रहावे,’ असा इशारा शहाजी पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोण कुठून काम करतोय हे महत्वाचे नाही, तर…; आव्हाडांच भाजपला प्रत्युत्तर
- चक्रीवादळाचा गोव्याला मोठा तडाखा ; केंद्राकडून सर्व सहाय्य मिळेल, अमित शहांची ग्वाही
- गंगेत मृतदेह टाकण्यापासून रोखा आणि सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करा; केंद्राचे राज्यांना निर्देश
- मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार – घाटगे
- कोरोनाचे हॉटस्पॉट असूनही ‘या’ गावात नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
