🕒 1 min read
नवी दिल्ली : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसलाय.
तर महाराष्ट्रालागत असणाऱ्या गोव्यात वादळाने जी प्रचंड हानी केली आहे, त्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चौकशी केली व गोव्यातील स्थिती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडून सर्व सहाय्य तथा पाठींबा मिळेल, अशी ग्वाही दिली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. उत्तर व दक्षिण गोव्यात वीज खांब तुटणे, वीज तारा तुटून वीज खंडीत होणे, घरांवर माड पडणे, आंबा, फणसाची झाडे पडणे, भींती खचणे, दीडशे घरांची छोटी- मोठी हानी होणे, टेलिफोन तारा तुटणे, रस्त्यांवर झाडे पडणे अशी बरीच हानी झालेली आहे. शहा यांचा फोन आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शहा यांना याविषयीची कल्पना दिली. राज्यात वादळामुळे दोघांचा बळी गेला व चौघे जखमी झाले. आपत्त्कालीन निधीतून राज्य सरकारने लोकांना मदत करण्याची ग्वाही दिलेली आहे. वादळामुळे ज्यांची हानी झाली त्यांना गोवा सरकार सहाय्य करील, असे मुख्यमंत्र्यांनीही सोमवारी म्हटले आहे.
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून पुढील काही तासांसाठी चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईपासून 160 किलोमीटरच्या आसपास समुद्रात आहे. दरम्यान बॉम्बे हाय तेलक्षेत्राजवळ बार्जवर २७३ जण अडकले आहेत, तर आणखी एका बार्जवर १३७ जण अडकले आहेत. अरबी समुद्रात चक्रीवादळ असल्यानं भीती व्यक्त करण्यात येतेय.अडकलेल्यांच्या सुटकेसाठी नौदलाच्या INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौका रवाना झाल्या आहेत. तसंच, INS तलवार सुद्धा बचावासाठी रवाना झाली असल्याची माहिती सध्या मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोण कुठून काम करतोय हे महत्वाचे नाही, तर…; आव्हाडांच भाजपला प्रत्युत्तर
- ‘चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव, संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार’
- कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आल्याचा जयंत पाटलांचा दावा
- मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार – घाटगे
- धोका कायम ! चक्रीवादळ गुजरात दिशेने, मात्र मुंबईसह कोकण किनारपट्टीला नवा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
