🕒 1 min read
मुंबई : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयाऐवजी मातोश्रीतुनच कारभार हाकत असल्याने जनता संकटात असताना मुख्यमंत्री घरात अशी टीका भाजपने केली होती.
आता कोरोनाच संकट पुन्हा एकदा वाढलं असतानाच ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. असं असताना देखील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी वा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मंत्रालयात येत नसल्याने भाजपने पुन्हा एकदा खोचक प्रहार केला आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार? कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी… त्यातच कोरोनाचे संकट, मुख्यमंत्री घरात बसलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पहाणी तरी केली पण..मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.
तर, ‘महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिटविला. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावे,’ असं आव्हान देखील केशव उपाध्ये यांनी दिलं आहे.
कोण कुठून काम करतो आहे
हे महत्वाचे नाही ……
काम होते आहे .. काम करता आहेत हे महत्वाचे वादळानि कमीत कमी नुकसान व्हावे व परिस्थती आवाक्यात राहावी ह्या साठी सरकार काम करते आहे काळजी नसावी @OfficeofUT @AjitPawarSpeaks— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 17, 2021
भाजपच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोण कुठून काम करतो आहे हे महत्वाचे नाही …काम होते आहे… काम करता आहेत हे महत्वाचे. वादळाने कमीत कमी नुकसान व्हावे व परिस्थती आवाक्यात राहावी ह्या साठी सरकार काम करते आहे काळजी नसावी,’ असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खतरो के खिलाडी’ शो खतरे मे! १२ भागानंतर कार्यक्रम होणार बंद
- ‘चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डाव, संजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार’
- कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आल्याचा जयंत पाटलांचा दावा
- मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार – घाटगे
- धोका कायम ! चक्रीवादळ गुजरात दिशेने, मात्र मुंबईसह कोकण किनारपट्टीला नवा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
