🕒 1 min read
मुंबई : देशभरात कोरोनाचा उद्रेक होतोय. अनेक राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्याला रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. कोरोनामुळे अनेक राज्ये लॉकडाऊन आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात यासारख्या महत्त्वाच्या राज्यात कोरोनाचा संसर्ग फैलावतोय. पण भाजपच्या एका नेत्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर मुक्ताफळे उधाळलीत.
युपीमध्ये कोरोना सध्या आटोक्यात आला आहे, त्याचे कारण म्हणजे तिथे योगी आदित्यनाथ आहेत असे विधान अभिनेते तथा भाजप नेते गजेंद्र चौहान यांनी केले आहे. चौहान यांनी एकापाठोपाठ व्टिट करुन योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केले आहे. ते हिंदू धर्माचे रक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी युपीमधील परिस्थिती नियंत्रणात आहे अशा आशयाचे विधान चौहान यांनी केल्यानं ते ट्रोल होत आहेत.
When others where crying and blaming centre, UP Chief Minister inspite of suffering from Corona was battling Corona for Us. And the results are showing, impact of Corona has reduced, it's not me ground realties saying that. #योगीजी_का_यूपी_मॉडल
— Gajendra Chauhan- मोदी का परिवार (@Gajjusay) May 12, 2021
चौहान यांनी लिहिले आहे की, योगीजी केवळ मुख्यमंत्रीच नाही तर हिंदू धर्माचे रक्षकही आहेत. सगळा देश त्यांना पसंत करतो. अशाप्रकारचे व्टिट केल्यानंतर चौहान ट्रोल झाले आहेत. देशात कुठले राज्य कोरोनाच्या बाबत सर्वाधिक सुरक्षित आहे असा प्रश्न जर विचारला गेला तर मला युपीचे नाव सांगावे लागेल. याचे कारण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. या शब्दांत त्यांनी योगींचे कौतूक केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलीस ममतांच्या कार्यकर्त्यांना भीत आहेत’, राज्यपालांचा गंभीर आरोप
- कोरोना रुग्णांच्या मृत्युप्रकरणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसात तक्रार
- ‘कुठून हे नग मिळतात?’, माजी मुख्यमंत्र्यांवर जितेंद्र आव्हाड संतापले
- ‘राऊत साहेब, डोळे उघडा.. किती यादी सांगू?’, भाजपचे प्रत्युत्तर
- ‘..पेट्रोल भरायला गेलो तरी तिथेही फोटो असतो’, अजित पवारांचा मोदींना चिमटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

