नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचा 8 वा हप्ता जारी केला. यावेळी त्यांनी देशवासियांशी सवांद साधला असता कोरोना संकटावर चिंता व्यक्त केली आहे. देशभरात सुरू असलेल्या कोरोना संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. गेल्या 100 वर्षानंतर आलेली ही महामारी जगाची परीक्षा घेत आहे. या संकटात आपण अनेक जवळच्या लोकांना गमावले आहे. कोरोना रुग्णांचं दु:ख मी समजू शकतो. भारत हिंमत हारणारा देश नाही. आपली एका अदृश्य शक्तीसोबत लढाई सुरू आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
कोरोना रुग्णांचे दु:ख, वेदना मी समजू शकतो. आपली लढाई एका अदृश्य शक्तीसोबत आहे. या करोना व्हायरसमुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. 100 वर्षानंतर ही महामारी आली आहे. ही महामारी पावलोपावली जगाची परीक्षा घेत आहे. या काळात आपण आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. गेल्या काही काळात देशावासियांनी जे भोगलं आहे. या संकटाच्या काळातही काही लोक स्वार्थासाठी औषधे आणि आवश्यक वस्तुंचा काळाबाजार करत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्याचे आवाहन मी राज्य सरकारांना करत आहे, असं त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी त्यांनी देशवासियांना भारत हिंमत हरणारा देश नाही कोणताही नागरिक हिंमत हरणार नाही. आपण लढू आणि जिंकू असा विश्वास देखील दिलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलीस ममतांच्या कार्यकर्त्यांना भीत आहेत’, राज्यपालांचा गंभीर आरोप
- ‘कुठून हे नग मिळतात?’, माजी मुख्यमंत्र्यांवर जितेंद्र आव्हाड संतापले
- ‘राऊत साहेब, डोळे उघडा.. किती यादी सांगू?’, भाजपचे प्रत्युत्तर
- ‘..पेट्रोल भरायला गेलो तरी तिथेही फोटो असतो’, अजित पवारांचा मोदींना चिमटा
- सलूनचालकाची आत्महत्या! अनेक दिवसांपासून होती आर्थिक विवंचना


