🕒 1 min read
उस्मानाबाद : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. केंद्र सरकार राज्याला ऑक्सिजन पुरवठा करत आहे. मात्र, राज्याला अधिक ऑक्सिजनची गरज आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात सुरु करण्यात आला आहे. हा प्रयोग दोन दिवसांपूर्वी यशस्वी झाला आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे २० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करणे शक्य असून येत्या काळात ही मर्यादा वाढवण्यात येईल. आज या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे उदघाटन केलं आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते विकास आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील व्हीसीव्दारे सहभागी झाले. तर, कारखाना स्थळावर खासदार ओमराजे निबांळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील, कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ईद-अक्षय्य तृतीया सणांनिमित्त कोविड रुग्णांना अन्नामृतकडून विशेष खीर अन आमरसाचे जेवण!
- मंठ्यात नागरिक दुसऱ्या ‘डोस’च्या प्रतीक्षेत
- १८ वर्षांखालील मुलांमध्ये कोरोनाची काही लक्षणे आहेत का? आता शिक्षक करणार सर्वेक्षण
- सोशल मीडियावर ओळखीनंतर तरूणीवर अत्याचार! पीडितेची दोन लाख रूपयांची फसवणूक
- शॉक लागल्याने मजूराचा मृत्यू, बांधकामाच्या ठिकाणी भिंतीचे प्लास्टर करताना घडली घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

