Share

‘सहा-आठ महिने भरपूर शिव्या दिलेल्या राज्यपालांना नम्रपणे भेटायला जाणे म्हणजे…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अधिकार नसून केंद्र सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतं असं म्हटलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आदी मंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेणे म्हणजे हास्यास्पद आणि दिशाभूल करणारी कृती आहे. गेले सहा-आठ महिने भरपूर शिव्या दिलेल्या राज्यपालांना नम्रपणे भेटायला जाणे, निवेदन देणे हा सोपा मार्ग वाटला. आता मराठा समाजाला उल्लू बनवणे थांबवा, कायदेशीर खोलात जाऊन कृती करा,’ असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले व मराठा आरक्षणासाठी केंद्राने निर्णय घ्यावा यासाठी निवेदन दिले. पण असे केवळ निवेदन देणे पुरेसे नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ ध्यानात घेता एखाद्या राज्यातील जातीला आरक्षण देण्याचा त्या राज्याचा अधिकार कायमच आहे.

त्यासाठी सर्वप्रथम त्या राज्यातील मागासवर्ग आयोगाने संबंधित जात मागास असल्याची शिफारस करणे, त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने त्यावर शिक्कामोर्तब करणे, त्यानंतर राष्ट्रपतींनी मंजुरी देणे व त्यानंतर संबंधित राज्याने कायदा करणे अशी प्रक्रिया आहे. मात्र, जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला असा मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा आघाडी सरकारने केला आहे, असं भाष्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!