साष्टपिंपळगाव : ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा जाणिवपूर्वक खेळखंडोबा केला आणि आता मराठा समाजाला नादी लावण्यासाठी बैठकांचे गुऱ्हाळ सुरू आहे. राज्यपालांकडे जात आहोत, राष्ट्रपतीकडे जाणार ही नुसती बेगडी पळापळ सरकारने सुरू केली आहे. यामुळे आता मराठा समाजाने लढण्यास सज्ज व्हावे. कॅबिनेट बैठकीत मराठा समाजातील तरुणांच्या नियुक्त्यांबाबत लवकर निर्णय घ्या अन्यथा १६ मे पासून समस्त मराठा समाजातील विद्यार्थी तरुण वर्ग ठिय्या आंदोलनात उतरेल. असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल यांनी मंगळवारी (दि.११) महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
पुढे ते म्हणाले, केंद्रातील आणि राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी व पुढाऱ्यांनी एकजुटीने मराठा आरक्षणाचा घात केला असून, तरूणांच्या भविष्यावर नांगर फिरवण्याचे महापाप या राज्यकर्त्यांनी केले आहे. परंतु आता मराठा तरूणांचा तळतळाट उफाळून बाहेर पडणार आहे, त्यांची झळ पुढील काळात राज्यकर्त्यांच्या भविष्याला बसणार आहेच.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकारने तातडीने काढावा, कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, एसबीईएस मधून विविध विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यात याव्यात, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी, कोरोना काळातील विद्यार्थ्यांच्या फिस परत करण्यात याव्यात, या मागण्या आज आणि उद्याच्या होणार्या कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात याव्यात आणि सरकारने जर हे मान्य नाही केले तर मराठ्यांनी लढण्यास सज्ज व्हावे असे आवाहन मनोज जरांगे पाटिल यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निर्बंध काळात अनावश्यक घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करावी – गृह राज्यमंत्री
- राज्य सरकारच्या दिरंगाईने रखडलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे भाजपने केले प्रतिकात्मक उद्घाटन
- सचिन वाझेला मोठा धक्का, पोलीस सेवेतून केले बडतर्फ!
- ‘लष्कर ए तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा!
- हे ठाकरे सरकार की ‘माग रे सरकार?’; भाजप नेत्याची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

