🕒 1 min read
मुंबई : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता मुंबईतील कोरोना लढ्याचं कौतुक देशपातळीवर केलं जात आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारापेक्षा कमी रुग्णवाढ झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १७१७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ६ हजार ८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आज एकूण २८ हजार २५८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता ९२ टक्क्यांवर पोहोचलं आहे.
#CoronavirusUpdates
११ मे, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – १७१७
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ६०८२
बरे झालेले एकूण रुग्ण – ६२३०८०
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९२%एकूण सक्रिय रुग्ण- ४११०२
दुप्पटीचा दर- १७० दिवस
कोविड वाढीचा दर (४ मे -१० मे)- ०.३९%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 11, 2021
मुंबईत सध्या ४१ हजार १०२ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १७० दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचं प्रमाण आता ०.३९ टक्के इतकं झालं आहे. मुंबईत सोमवारी देखील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा दोन हजाराहून कमी नोंदवला गेला होता. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील आतापर्यंतची कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ७९ हजार ९८६ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ६ लाख २३ हजार ८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात आज ४० हजार ९५६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल ७१ हजार ९६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, गेल्या चोवीस तासात ७९३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण ५ लाख ५८ हजार ९९६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना मुक्तीकडे औरंगाबादची वाटचाल, मात्र आता खरी गरज सतर्कतेची!
- जायकवाडी धरण उशाशी असूनही, पैठणवासीयांच्या घशाला कोरड!
- इतर शहरांनी मुंबई, पुण्याकडून शिकण्याची गरज ; मोदी सरकारने केले कौतुक
- कॅबिनेट बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास, आम्ही लढण्यास सज्ज- साष्टपिंपळगाव आंदोलक
- राज्यात कोरोनामुक्तांच्या संख्येत मोठी वाढ, तर नवे कोरोना रुग्णही वाढले !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

