🕒 1 min read
नवी दिल्ली : राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कोरोना स्थती आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर, आता जवळपास निम्मा महाराष्ट्र हा पूर्ण लॉकडाउनच्या गर्तेत गेला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्तांमध्ये मोठी वाढ होत आहे. तर, नव्या रुग्णांमध्ये देखील मोठी घट होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले होते. मात्र, आज कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असून नव्या रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा ४० हजारांपार गेला आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाने सर्वात जास्त थैमान घातलं होतं. पण दोन्ही शहरांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेलाही चांगलंच नियंत्रणात ठेवलं आहे. इतर शहरांनी मुंबई, पुण्याकडून शिकण्याची गरज आहे. सुरुवातीला सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या मुंबई, पुण्याचं आता मोदी सरकारनेही कौतुक केलं आहे. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई, पुणे मॉडेल्सची अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
#COVID19 संसर्ग नियंत्रणासाठी मुंबईने अमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे मॉडेल देशपातळीवर राबवण्याची गरज#Unite2FightCorona @mybmc
????https://t.co/AOtSloL1sZ pic.twitter.com/rSQWUMMzBS— PIB in Maharashtra ???????? (@PIBMumbai) May 11, 2021
देशातील कोरोनाच्या सद्यपरिस्थितीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुंबई, पुण्याचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला. हा उल्लेख इथली कोरोना प्रकरणं वाढत आहेत म्हणून नाही तर ती नियंत्रणात असल्याचा होता. या दोन्ही शहराच्या मॉडेल्सची अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवरही व्हावी, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले आहे.
पुण्याने #COVID19 च्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मिळवलेल्या यशाबद्दल, आरोग्य मंत्रालयाने पुण्यातील यंत्रणांचे कौतुक केले.#Unite2FightCorona pic.twitter.com/TQQKm3Lpw6
— PIB in Maharashtra ???????? (@PIBMumbai) May 11, 2021
दरम्यान, महाराष्ट्रात आज ४० हजार ९५६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल ७१ हजार ९६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, गेल्या चोवीस तासात ७९३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण ५ लाख ५८ हजार ९९६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कॅबिनेट बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास, आम्ही लढण्यास सज्ज- साष्टपिंपळगाव आंदोलक
- राज्य सरकारच्या दिरंगाईने रखडलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे भाजपने केले प्रतिकात्मक उद्घाटन
- सचिन वाझेला मोठा धक्का, पोलीस सेवेतून केले बडतर्फ!
- ‘लष्कर ए तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा!
- हे ठाकरे सरकार की ‘माग रे सरकार?’; भाजप नेत्याची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

