Share

जायकवाडी धरण उशाशी असूनही, पैठणवासीयांच्या घशाला कोरड!

Published On: 

🕒 1 min read

पैठण : शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जायकवाडी येथील पंप हाऊसवरील वीज अनेक वारंवार खंडित होत असते. यामुळे मात्र शहराच्या पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. वीज मंडळाच्या गलथानपणाचा फटका नगरपरिषद पाणी पुरवठा विभागास बसत असून ऐन रमजानच्या काळात जायकवाडी येथील पंप हाऊसचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मंगळवारी (दि.११) लोक प्रतिनिधी, वीज मंडळाचे संबधित अभियंता व पैठण पोलिसांची बैठक बोलावली होती.

उन्हाळा आणि रमजान महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे दृश्य पैठण शहरात पहावयास मिळत आहे. नागरिकांना पाणी वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांच्या मनात नगरपरिषदच्या पाणी पुरवठा विभागाविरुद्ध असंतोष खदखदत असल्याने महावितरणच्या चुकीची किंमत नगरपरिषदेला मोजावी लागत आहे. कंपनीच्या कारभाराला वैतागलेल्या पैठणचे नगराध्यक्ष सुरज लोळगे, उपनगराध्यक्ष जोशी यांच्यासह पाणी पुरवठा सभापती अजित पगारे, शिवसेनेचे पालिका गट नेते तुषार पाटील आदी नागरिकांनी थेट महावितरणच्या गलथान कारभाराविरूद्ध रविवारी रात्री ११ वाजता थेट पोलीस ठाणे गाठत वीज मंडळाच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

पो.नि. किशोर पवार यांनी नगराध्यक्ष सुरज लोळगेसह उपस्थित नगरसेवकांची तसेच नागरिकांची समजूत घातली. याबाबत महावितरण, महसूल विभागासोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ. असे आश्वासन दिले. मात्र, बराच वेळ नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक हे महावितरण कंपनी विरूद्ध तक्रार घ्याच म्हणून आग्रही होते. मात्र, पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकूणच निर्णय घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे अखेर गुन्हा न दाखल करताच सर्वांना माघारी परतावे लागले.

जायकवाडी पंप हाऊसवर वारंवार वीज खंडित होत असल्याने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. त्यामुळे नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी पैठण, तहसीलदार, पोलिस निरीक्षक पैठण यांना महावितरण विरुद्ध नागरिकांना वेठीस धरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा. असे निवेदन दिले आहे. यापार्श्वभूमीवर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मंगळवारी (दि.११) लोक प्रतिनिधी, वीज मंडळाचे संबधित अभियंता व पैठण पोलिसांची बैठक बोलावली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!