Share

केकेआरच्या ‘या’ दोन खेळाडुंनी केली कोरोनावर मात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयला स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करावी लागली.

स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ४ मे रोजी कोलकाता नाइट रायडर्सचे दोन खेळाडू संदिप वॉरीयर आणि वरुण चक्रवर्ती यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार दोघांनी कोरोनावर मात केली असुन दोन्ही खेळाडू हे स्वगृही परतले आहेत. वरुण चक्रवर्ती हा मुळचा तामीळनाडूचा आहे तर संदिप वॉरीयर हा केरळचा आहे. तेव्हा हे दोन्ही खेळाडू जेव्हा त्यांच्या राज्यात परत जातील तेव्हा त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल असे सागंण्यात आले आहे. यादरम्यान केकेआर संघाचे वैद्यकीय पथकाची त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष आहे.

स्पर्धेदरम्यान वरुण चक्रवर्तीला खांद्याच्या दुखापतीसाठी बायो बबल मधून बाहेर पडून हॉस्पिटल मध्ये स्कॅन करण्यासाठी जावे लागले होते. याच दरम्यान त्याला संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्या संपर्कामुळे संदीप वॉरियरला देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता. तर संदीपच्या संपर्कात आल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राला देखील कोरोनाची लागण झाली. या वाढत्या संक्रमणामुळे नाइलाजास्तव बीसीसीआयने आयपीएलचा यंदाचा हंगाम अर्ध्यातच स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!