मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार ‘विराट कोहली आपल्या सहकाऱ्यांना कशी वागणूक देतो याचा खुलासा भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने केला आहे. कर्णधार म्हणून तो आपल्या सहकाऱ्यांना कश्या प्रकारे सांभाळून घेतो याचा देखील यावेळी खुलासा केला आहे.
एक माध्यमाशी बोलताना शमी म्हणाला, ‘विराट नेहमीच गोलंदाजांना पाठिंबा देत असतो त्यांना मनाप्रमाणे गोलंदाजीचे करण्याचे स्वातंत्र्य देखील देतो. कोहली आम्हाला आमच्या योजनांबाबत विचारतो. आम्ही आमच्या योजनांमध्ये अपयशी ठरलो तरच तो सल्ला देतो. विराटने कधीही आमच्यावर दडपण आणले नाही. तुम्ही कर्णधार कोहलीपुढे उभे आहात, असे कधीही वाटणार नाही. तो बालपणीच्या मित्रासारखा तुम्हाला वागणूक देतो.’
बऱ्याचदा विराट मजा मस्ती करत असतो जेणेकरून संघातील ताण तणाव कमी राहील. बऱ्याचदा तो अनेकांची फिरकी देखील घेत असतो. मात्र काही वेळेला तो रागातही येतो. मात्र विराट कधीही सहकाऱ्यांना वाईट वागणूक देत नाही. विराट प्रमाणे कुठलाही कर्णधार तुम्हाला अशाप्रकारचे स्वातंत्र्य देत असेल, असे मला तरी वाटत नाही,’ असे म्हणत शमीने विराटवर स्तुतिफळे उधळली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुणीतरी येणार येणार गं..’ ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सच्या घरी लग्नाआधीच पाळणा हलणार
- सरकारी काम आणि सहा महिने थांब! भाजप करणार ऑक्सिजन प्लांटचे प्रतिकात्मक उदघाटन
- लोकांना पाणी पाजण्यासाठी उद्घाटन केले! दोन आठवड्यानंतर आ. शिरसाट यांचा खुलासा
- आ. शिरसाट यांची आढावा बैठकीला हजेरी, कारवाईसाठी पोलीस उदासीन
- कोरोना बाधित लहान मुलांवरील उपचारासाठी पुणे महापालिका स्थापन करणार ‘टास्कफोर्स’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

