Share

‘कुणीतरी येणार येणार गं..’ ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सच्या घरी लग्नाआधीच पाळणा हलणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द झाली. स्पर्धा रद्द होताच विदेशी खेळाडू मायदेशी परतले आहे. यादरम्यान केकेआर संघाचा सदस्य असलेला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

रविवारी जेव्हा जगभरात मदर्स डे साजरा होत होता त्यावेळी पॅट कमिन्सची भावी पत्नी बेकी बॉस्टन हीने ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. कोलकाता नाइट रायडर्स संघाने ट्विट करत ही आनंदाची बातमी केकेआरच्या चाहत्यासोबत शेअर केली आहे. या ट्विटमध्ये ‘मदर्स डेच्या दिवशीच किती गोड बातमी’ असे लिहीले आहे.

https://www.instagram.com/p/CN_76WXrDSY/

नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएल स्पर्धेत कमिन्सने केकेआरकडून ७ सामने खेळताना ९ गडी बाद केले होते. तसेच पॅटने चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध खेळलेली नाबाद ६६ धावांची खेळी ही आयपीएल २०२१ स्पर्धेतील सर्वोत्तम खेळींपैकी एक होती. त्यानंतर भारतात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी ५० हजार डॉलर्सची मदत जाहीर केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!