Share

सरकारी काम आणि सहा महिने थांब! भाजप करणार ऑक्सिजन प्लांटचे प्रतिकात्मक उदघाटन

Published On: 

औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ऑक्सीजन प्लांट हा मागील सहा महिन्यापासून अजून अस्तित्वातच आला नाही, या प्रकल्पालाचा सर्वसामान्य जनतेसाठी उपयोग काय? असा सवाल करत, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संजय केनेकर मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन या ऑक्सीजन प्लांटचे प्रतिकात्मक उद्घाटन करणार आहेत.

कोरोणाच्या माहामारी मध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार सर्व जिल्ह्यांना सहा ते सात महिन्यापासून विविध उपाययोजना करण्यासाठी सुचवत आहे, त्या उपायोजना स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाने करणे अपेक्षित आहे. परंतु शासकीय काम आणि सहा महिने थांब,या म्हणीचा प्रत्यय शराततील नागरिकांना रोज येत आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून मंजूर झालेले ऑक्सीजन प्लांट हे कागदावरच आहे.

सहा महिन्यांपूर्वी एखाद्या शासकीय कामाचा आदेश निघून ते काम या प्रचंड मोठ्या महामारी मध्ये जर उपयोगी येत नसेल तर ,या शासकीय अधिकारी पदाधिकारी यांच्या दप्तर दिरंगाई मुळे शासकीय काम आणि सहा महिने थांब या ध्येय धोरणामुळे जिल्ह्यातील, तसेच मराठवाड्यामध्ये जनता मृत्यूच्या दरी मध्ये लोटली जात आहे, एखाद्या कामाचं भुमिपुजन करून लोकार्पण करण्यापर्यंत हे वेगाने होणे अपेक्षित असताना. अद्याप ते झाले नसल्याने निषेध व्यक्त करणार असल्याचे भाजपच्या वतीने कळवले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!