🕒 1 min read
मुंबई : भारतात सुरु आसलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भानामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर काही दिवसातच बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. जुन महिन्यात भारतीय संघ न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळायला जाणार आहे.
मात्र श्रीलंकेच्या या दौऱ्यात भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे या दौऱ्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली उपस्थीत नसणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न उपस्थीत होत आहे. मात्र यादरम्यात या दौऱ्यासाठी भारताचा आघाडीचा फलंदाज के एल राहुलचे नाव पुढे येत आहे. कारणा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
मात्र के एल राहुल जर या दौऱ्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही तर त्या परिस्थीतीत भारताचा आघाडीचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतकडे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे. कारण नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपीटल्स संघाचे नेतृत्व रिषभ पंतने चांगले केले होते. श्रीलंका दौऱ्याचा कार्यक्रम आणि या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा ही जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विराट सहकाऱ्यांना बालपणीच्या मित्रासारखी वागणूक देतो : मोहम्मद शमी
- ‘हा’ खेळाडू इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात स्थान मिळवु शकला असता, राहुल द्रविडने केले व्यक्त मत
- ‘कुणीतरी येणार येणार गं..’ ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सच्या घरी लग्नाआधीच पाळणा हलणार
- सरकारी काम आणि सहा महिने थांब! भाजप करणार ऑक्सिजन प्लांटचे प्रतिकात्मक उदघाटन
- लोकांना पाणी पाजण्यासाठी उद्घाटन केले! दोन आठवड्यानंतर आ. शिरसाट यांचा खुलासा


