Share

‘हा’ खेळाडू इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात स्थान मिळवु शकला असता, राहुल द्रविडने केले व्यक्त मत

Published On: 

मुंबई : भारतात सुरु आसलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भानामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर काही दिवसातच बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी घोषीत केलेल्या संघाविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.

आता माजी भारतीय क्रिकेटपटु ‘द वॉल’ म्हणुन प्रसिद्ध असलेला राहुल द्रविडने या संघाबाबत मत व्यक्त केले आहे. द्रविड म्हणाला की, ‘इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेला संघ समतोल आहे. मात्र या संघात भारताचा फिरकीपटू कुलदिप यादव स्थान मिळवु शकला असता. मात्र संघात अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने नजीकच्या काळात जी कामगीरी केली त्यामुळे संघाची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे. हे स्पष्ट दिसत आहे.’

यावेळी पुढे बोलताना द्रविड म्हणाला की, ‘भारतीय संघात निवड झालेले फिरकीपटु हे फलंदाजीतही चांगले योगदान देतात. त्यामुळे फलंदाजीची खोली वाढते. यामुळे कुलदीप यादव हा संघात बसु शकत नसावा’ असा अंदाज द्रविडने व्यक्त केला. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!