🕒 1 min read
रायगड : महाराष्ट्रात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून उन्हाळा देखील मोठ्याप्रमाणावर जाणवत आहे. राज्यात सध्या विविध मुद्द्यांवरून राजकारण देखील चांगलेच तापले असताना दुसऱ्या बाजूला काही लोकप्रतिनिधी मात्र जीवाची पर्वा न करता आपले काम पुढे नेताना दिसत आहेत. अशा लोकप्रतिनिधींची संख्या कमी असली तरीही यात खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नाव नेहमीच पुढे असते. संभाजीराजे हे आपल्या कर्तव्यात कोणतीही कसर सोडत नाहीत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
संभाजीराजेंचे व गडकोटांचे नाते हे संपुर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. गेले अनेक वर्षे हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडाच्या संवर्धनासाठी संभाजीराजेंनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, आज सकाळी उठून, ते भर उन्हात दुपारी १२ वाजता दुर्गराज रायगडावर गेले. २०० किलोमीटर चा प्रवास करून गडावर चाललेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी भर उन्हात गड सर करून गेले. अत्यंत कडक उन्हात त्याठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधत चर्चा केली. यावेळी संभाजीराजे यांनी रायगड प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक करीत प्रोत्साहन दिले.
यासंदर्भात त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून माहिती दिली आहे. राजे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ‘आज सकाळी कोल्हापूरहून रायगडास निघालो. साधारण १२ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर नाणे दरवाजामार्गे गड चढून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. लॉकडाऊनमुळे रोपवे बंद आहे, अशा परिस्थितीत प्राधिकरणाचे अधिकारी दररोज गड पायी चढतात. रखरखत्या ऊन्हात देखील गडावरील सर्व कामे अविरतपणे सुरू आहेत. रायगड प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग घेत असलेल्या मेहनतीस प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. वेळोवेळी रायगडास भेट देऊन सुरू असलेल्या कामांवर लक्ष देत असतो,’ असे त्यांनी म्हटले आहे.
https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1869377073220503
रायगड विकास प्राधिकरण चे अध्यक्ष झाल्यानंतर राजे महिन्यातून २-३ वेळा गडावर जातातच. राजे यांनी जातीने लक्ष दिल्यानेच आज रायगडावर झालेला विकास पाहून डोळे भरून येतात. गडकोटांकडे आजवर अनेकांनी दुर्लक्ष केले पण आपण गडकोटांसाठी जे करताय संभाजीराजे करत आहेत ते पाहून शिवभक्तांची राजे छाती अभिमानाने फुगते.
महत्वाच्या बातम्या
- ‘या हुजऱ्याने आमच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जींशी केलीये’
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- विधानसभा निवडणुकांत इतका वाईट पराभव का झाला? ; सोनिया गांधींनी व्यक्त केली चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
