Share

ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय

Published On: 

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची (एलएमओ) वाहतूक करणाऱ्या टँकर आणि कंटेनरला टोल प्लाझा येथे कोणताही टोल भरावा लागणार नाही. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे देशभरातील वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता, द्रवरूप वैद्यकीय रुग्णवाहिकांसारख्या अन्य आपत्कालीन वाहनांप्रमाणेच दोन महिने किंवा पुढील आदेशापर्यंत ऑक्सिजन असलेल्या कंटेनरला गणले जाणार आहे.

फास्टॅगच्या अंमलबजावणीनंतर टोल प्लाझाजवळ प्रतीक्षा काळ जवळपास संपुष्टात आला आहे. तरी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वैद्यकीय ऑक्सिजनच्या शीघ्र आणि सलग वाहतुकीसाठी अशा वाहनांना आधीच मार्गिका प्राधान्य दिले आहे. प्राधिकरणाने त्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि इतर हितधारकांना महामारीविरोधात लढा देण्यासाठी सरकार आणि खासगी प्रयत्नांना कृतीशील मार्गाने मदत करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत.

कोरोनाच्या उद्रेकामुळे देशभर द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची मोठी मागणी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या संकटाच्या वेळी, गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णालयांमध्ये आणि वैद्यकीय केंद्रांमध्ये द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन वेळेवर वितरित होणे महत्त्वाचे असते. टोल प्लाझावर वापरकर्ता शुल्क भरण्यात माफी मिळाल्याने राष्ट्रीय महामार्गांवर वैद्यकीय ऑक्सिजनची वेगवान वाहतूक सुनिश्चित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!