Share

‘कोरोनाशी लढण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, एकट्या मोदींना ते अशक्य’, नवाब मलिकांचा टोला

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाचा दिवसेंदिवस उद्रेक होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि नियोजन पूर्णपणे ढासळल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी विविध उपाययोजना करून कोरोना हद्दपार होण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलवा. त्यातून मार्ग काढा. पंतप्रधान मोदी हे एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

मलिक म्हणाले की, पूर्वी विरोधक जे बोलत होते, तेच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी आता बोलत आहेत. देशात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा देखील तुडवडा आहे. मोदींच काहीच नियोजन नाही. आधी अधिकार घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्र हात झटकत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक बोलावून निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत मलिक यांनी व्यक्त केले. सर्व देशातील नेत्यांची बैठक मोदींनी बोलवावी आणि परिस्थिती समजून घ्यावी. विदेशातून सामान येत आहे. परंतु, त्याचे वाटप देखील होत नाही. केंद्राने मोठ्या प्रमाणत ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची ऑर्डर द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, देशातील कोरोनाच्या स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांना राज्यांतील कोरोनाच्या स्थितीची माहिती देण्यात आली. मोदींनी औषधांचा तुटवडा, लसीकरण याबाबत निर्देश दिले. राज्यांनी कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!