Share

‘मराठा आरक्षणाबद्दल भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक’, अर्जुन खोतकरांची टीका

Published On: 

🕒 1 min read

जालना: मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे असा सर्वपक्षीय एकमुखी ठराव राज्य विधिमंडळात झालेला असताना आणि मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेली असतानाही मराठा समाजास आरक्षण मिळू शकले नाही. न्यायालयीन निकालावर टिपणी करता येत नसली तरी भारतीय जनता पक्षाने याबाबत राज्य सरकारला जबाबदार धरणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा तसेच मराठा आरक्षणा संदर्भात भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक भाषा असल्याचे टीका माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान खोतकर म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत भाजप-शिवसेना युतीच्या काळात झालेला निर्णय आणि भाजपने दिलेला वकील कायम ठेवूनही भाजपने राज्य सरकारला जबाबदार धरणे म्हणजे भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक भाषा असल्याचे सामान्य जनतेला कळून चुकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांना अनेकदा वेळ मागूनही दिला गेला नाही. देशातील दोन राज्यात ५० टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण दिले गेले आहे. विधीमंडळात सर्वपक्षीय निर्णय झालेला असतानाही तीन पक्षाच्या सरकारमध्ये एकमत नसल्याची टीका करणे हास्यास्पद आणि खोटारडेपणाचा कळस म्हणावा लागेल. आरक्षणाचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात आहे.

भाजप मराठा समाजाचा उपयोग करुन घेत आहे. ज्याप्रमाणे ३७० कलम रद्द केले, ॲट्रॉसिटीचा निर्णय घेतला, तिहेरी तलाकचा निर्णय घेतला त्याप्रमाणेच मराठा आरक्षणासाठी कायद्यात बदल करु, असे भाजपकडून का सांगितले जात नाही, मात्र भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ये पब्लिक है सब जानती है, असा टोलाही खोतकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!