🕒 1 min read
औरंगाबाद : मार्च महिन्यात जिथे तिन ते पाच हजार रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत होते तिथे दोन महिन्यांनंतर आज शहरातील होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या ८७० वर येऊन ठेपली आहे. चाचण्यांची वाढलेली संख्या, संचारबंदी, कडक निर्बंध, मास्कचा वाढलेला वापर यामुळे शहरातील एकुणच पॉझिटीव्हीटी रेट कमी झाला आहे. याच कारणांमुळे शहरात घरीच राहून उपचार घेणाऱ्यांची संख्या निम्म्यावर आली आहे. यामुळे औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळत आहे. येणाऱ्या काळातही असेच निर्बंध पाळल्यास हळूहळू हिच संख्या शून्यावर येण्यास वेळ लागणार नाही.
औरंगाबाद जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी शहरातील दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या २० ते २५ वर आली होती. मात्र मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. मार्च-एप्रिलमध्ये रोजचे १२०० ते १८०० रुग्ण निघत होते. मात्र एवढ्या रुग्णांना उपचार देण्यात महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग अपयशी ठरलेले दिसून आले.
आरोग्य यंत्रनेवरील ताण मोठ्या प्रमाणावर वाढला होता. खासगी व सरकारी रूग्णालयांतील बेड्स अपुरे पडत असल्याने मार्चच्या २५ तारखेला शहरात एकुण चार हजार ६७२ कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत होते. बेड्सच्या अभावी अनेकांनी होम आयसोलेशनचाच पर्याय स्विकारला होता. त्यामुळे घरी राहून उपचार घेणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच होता.
शहराचा पॉझिटीव्हीटी रेट कमी
शहरातील कोरोना रुग्णांची जी एकुण संख्या होती तीच मुळात कमी झाली आहे. पॉझिटीव्हीटी रेट कमी झाला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांवर बंधने आहेत. दुकाने बंद असल्याने तेथील गर्दी कमी झाली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी सुरु असल्याने कोरोना स्प्रेडर सापडत आहेत. औरंगाबादकरही मास्कचा वापर करण्याविषयी गंभीर होत आहे. आणि याच सर्व कारणांमुळे शहरातील आकडा हळूहळू कमी होत आहे. होम आयसोलेशनची संख्या ३ हजारांवरुन आज ८०० वर आली आहे. येत्या काळात ही संख्या अजून कमी होणार आहे.
–डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा
६ दिवसात अशाप्रकारे घटली होम आयसोलेट संख्या
२९ एप्रिल -१६४०
३० एप्रिल -१५९०
१ मे – १५१०
२ मे – १४७०
३ मे – १२१०
४ मे – १०२०
५ मे – ८७०
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्रात भाजपा क्रमांक एकवर राहण्यासाठी मी जीवाचं रान करणार : काकडे
- नांदेडमध्ये ४२२ नवे कोरोना रुग्ण; १२ जणांचा मृत्यू
- औरंगाबादेत दोन दिवसांआड पाणी देता येईल का?, मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात चर्चा
- सोलापूरकरांचा नाद खुळा! तीन लाखांचा दंड भरू पण, मास्क लावणार नाही
- तिसरी लाट कोरोनाची नाही, मराठ्यांची असेल; नितेश राणेंची गर्जना !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

