मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील याबाबत सूचक विधान केलं आहे. ‘तिसरी लाट कोरोनाची नाही, मराठ्यांची असेल’ असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच समाज माध्यमांद्वारे लाईव्ह येऊन मराठा समाजाला संयम राखण्याचं आवाहन केलं आहे.
एक मराठा लाख मराठा !!! pic.twitter.com/iEpjJAyP7R
— Nitesh Rane (@NiteshNRane) May 6, 2021
मात्र, लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत एकमत झालं आहे. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती विनायक मेटे यांनी दिली. यामुळे कोरोना हाताळताना त्रेधा तिरपीट झालेल्या राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सुर नवा’च्या सेटवर आ. सरदेसाईने गोधंळ घालत चित्रीकरण बंद करण्याची केली मागणी
- मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे – खेडेकर
- पुन्हा एकदा कॅप्टन कूल धोनीने जिंकले चाहत्यांचे मन ; घेतला ‘हा’ निर्णय
- इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडून नोटीस
- ‘सर्वोच्च न्यायालयातील अपयशाची जबाबदारी अशोक चव्हाण व राज्य सरकारला घ्यावीच लागेल’


