🕒 1 min read
पुणे – देशात कोरोनाच्या दूसऱ्या लाटेमुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रुग्णालयात वैद्यकीय सेवांचा तुटवडा पडत आहे. अशात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभाव्यता दर्शवण्यात आली आहे. हा धोका लक्षात घेऊन पुणे महापालिकेने उपचाराच्यादृष्टीने उपाययोजना वाढविण्याच्या प्रयत्न सुरू केला आहे. पुण्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. तिसऱ्या लाटेत अल्पवयीन मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढू शकतो ही शक्यता गृहीत धरून येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात मुलांसाठी स्वतंत्र ५० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.
येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयामध्ये लहान मुलांवरील उपचारासाठी स्वतंत्र ५० बेडचे हॉस्पिटल राखीव ठेवण्यात येणार आहे. मुलांचे पालकही बाधित असतील, तर त्यांच्यावरही याच ठिकाणी उपचारासाची सुविधा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. महापालिकेकडे सध्या ९ बालरोग तज्ज्ञ असून, आणखी बालरोग तज्ज्ञ नेमण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.
सुरवातीला कोरोनाचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला, तर दुसऱ्या लाटेमध्ये तरुणवर्ग सापडला आहे. अचानकपणे आलेल्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गाचा अंदाज न आल्याने बेड, ऑक्सिजन बेडस्, व्हेंटिलेटर बेडपासून ते रेमडेसिविर आणि अन्य औषधांचा तुटवडा भासत आहे. त्यातून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये लहान मुले बाधित होऊ शकतील, असे भाकीत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ही पाऊले उचलण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही’ : केदार शिंदे
- पोलिसांनी चक्क रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना केली मारहाण!
- बीडमध्ये १ हजार ४३९ कोरोना रुग्णांची वाढ तर १ हजार १४० जणांनी केली कोरोनावर मात
- आसाराम बापूची तब्येत खालावली, कोरोना झाल्यानंतर ICU मध्ये दाखल
- एप्रिलमधील आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या स्पर्धेत पाकच्या खेळाडुंना नेपाळच्या खेळाडुचे आव्हान


