Share

कोरोना हा चेष्टा करण्याचा विषय राहिला नाहीये, सुरेश रैनाने केले वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.

आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्ध्यातच रद्द करण्यात आली. ही स्पर्धा संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू सुरेश रैनाने भारतातील कोरोना परिस्थीतीवर ट्विट करत परिस्थीतीचे गांभीर्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्विटमध्ये रैना म्हणतो.’कोरोना हा काही आता चेष्टेचा विषय राहिला नाहीये. कितीतरी जीव टांगणीला लागले आहे. आयुष्यात इतका हताश कधीच झालो नव्हतो. आपण कितीही मदत करण्याचा प्रयत्न केला तरी आपले प्रयत्न कमीच पडत आहे.’ असे लिहीले आहे.

तसेच या ट्विटमध्ये रैना पुढे म्हणतो की,’या परिस्थीतीत त्या प्रत्येक व्यक्तिला माझा सलाम जो लोकांचे जिव वाचवण्यासाठी उभा आहे.’ असे लिहत रैनाने वुई कॅन डु इट हा हॅशटॅग त्याने लिहीला आहे. आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा आयपीएलमध्ये शिरकाव झाला आणि बीसीसआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगीत केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!