🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या परदेशी क्रिकेटपटूंचा आपापल्या देशांत परतण्याचा प्रवास सुरू झाला.
यानंतर ट्विटरवर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने एक व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी दोन आठवड्यापूर्वीच आयपीएलपेक्षा लोकांचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे, असं सांगितलं होतं. आयपीएल स्थगित करावी लागली, हे असं होणारचं होतं’, असं शोएब म्हणाला.
IPL canceled. I saw it coming & suggested that two weeks ago. Nothing more important than saving human lives during current covid crisis in India.
Full video: https://t.co/pl0sRdIcSU#Ipl #IndianPremierLeague pic.twitter.com/MRrzacKuNX
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) May 4, 2021
याआधी शोएब अख्तर म्हणाला होता, कोरोना महामारीचं वाढतं संकट लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आणि पाकिस्तान प्रमिअर लीग (PSL) स्पर्धा पुढे ढकलावी. क्रिकेटपेक्षा नागरिकांचे जीव वाचणं महत्वाचं असून क्रिकेट स्पर्धांवर खर्च होणारा पैसा कोरोना संकटासाठी वापरण्यात आला तर मोठी मदत होईल, असं शोएब अख्तर म्हणाला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही’ : केदार शिंदे
- पोलिसांनी चक्क रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना केली मारहाण!
- बीडमध्ये १ हजार ४३९ कोरोना रुग्णांची वाढ तर १ हजार १४० जणांनी केली कोरोनावर मात
- आसाराम बापूची तब्येत खालावली, कोरोना झाल्यानंतर ICU मध्ये दाखल
- एप्रिलमधील आयसीसी सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या स्पर्धेत पाकच्या खेळाडुंना नेपाळच्या खेळाडुचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

