Share

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन, कर्मचाऱ्यांसाठी कार्यगटाची स्थापना

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :  कोरोनानंतरचे आयुष्य ‘न्यू नॉर्मल‘ म्हणून ओळखले जात आहे. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी धैर्याने सामोरे जाणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन व कर्मचारी, प्राध्यापकांसाठी कार्यगट स्थापन करण्याची घोषणा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने ‘कोविड – १९‘ नंतरचे जीवन‘ या विषयावर ऑनलाईन व्यााख्यानमाला घेण्यात येणार आहे. मानसशास्त्र विभागाच्या पुढाकाराने शुक्रवारी व्याख्यान झाले. या कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी व्याख्यानमालेचे उद्घाटन केले. या ऑनलाईन संवादात प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक व विभागप्रमुख सहभागी झाले. यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, की कोविडननंतरच्या परिस्थिती संदर्भात विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.

या पार्श्वभुमीवर विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित समस्या, प्रश्न तसेच समुपदेशन करण्यासाठी ‘दोन कार्य गट‘ स्थापन करण्यात येणार आहेत. उस्मानाबाद उपपरिसर संचालक डॉ. डी. के. गायकवाड हे प्राध्यापकांच्या गटाचे प्रमुख राहणार आहेत. तर बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक, कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर हे कर्मचारी, अधिकारी कार्यगटाचे प्रमुख असणार आहेत. या गटात स्वेच्छेने काम करू इच्छिणाऱ्या कर्मचारी, प्राध्यापकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. सर्वांचे आरोग्यविषयक तसेच अन्य प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न हा गट करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!