Share

जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : पालकमंत्री

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी (दि.१) व्यक्त केले आहे.

जिल्ह्याच्या नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी प्रयत्नांची शर्त केली जात आहे. जिल्ह्याचा भव्य विस्तार व ३८ लाखाच्या जवळपास लोकसंख्या विचारात घेतली. तसेच जिल्ह्यात १२ ग्रामीण रुग्णालय, ६८ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३७७ आरोग्य उपकेंद्रे उभारुन आपण आरोग्य सुविधेचे जाळे भक्कम केले आहे. या व्यतिरिक्त चार उपजिल्हा रुग्णालय, एक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, एक आयुर्वेदिक महाविद्यालय, एक जिल्हा रुग्णालय, एक स्त्री रुग्णालय याची सक्षम यंत्रणा आपल्याकडे असल्याचे देखील चव्हाण या वेळी सांगितले.

या सर्व आरोग्य सुविधेचा विचार करुन ही सेवा अधिक भक्कम होण्यासाठी आता जिल्ह्यात ५२ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत असताना स्वाभाविकच आनंद होत असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाचा छोटेखानी समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या  

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!