Share

‘अडचणीच्या काळात भारताला मदत करताना अमेरिकेला समाधान वाटतंय’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- भारतात सध्या कोरोनामुळे परिस्थिती बिकट बनत चालली आहे.या संकट काळात अनेक देश मदतीला धावून येत असल्याचे चित्र आहे. अमेरिकेनं पाठवलेली, हवेतून प्राणवायू वेगळा काढणारे  600 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्ली विमानतळावर दाखल  झाले आहेत.

दरम्यान, भारताच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करत असल्याबद्दल अमेरिकेला समाधान वाटत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी काल सांगितलं आहे.दुसऱ्या बाजूला काल हॉंगकॉंग इथूनही स्पाइस जेट कंपनीच्या विमानातून 1 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतात आणण्यात आले. तसंच, जर्मनीने पाठवलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही काल भारतात दाखल झाले आहेत.इराण, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, भूतान, नॉर्वे यांच्यासह इतर अनेक देशांनी भारताला मदत देऊ केली आहे.

दरम्यान, भारतात कोरोना संसर्ग वाढत असताना अनेक खेळाडूही मदतीचा हात पुढे करत आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. आयपीएल स्पर्धेतल्या राजस्थान रॉयल्स संघानंही त्यांच्या रॉयल राजस्थान फौंडेशन आणि ब्रिटीश एशियन ट्रस्टच्या माध्यमातून साडे सात कोटी रुपये उभारण्याचा निश्चय केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!