Share

बीडमध्ये १४७० नवे बाधित; गुरुवारच्या आकड्यांनी चिंतेत भर

Published On: 

बीड: कोरोनाचा संसर्ग वाढतच असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे बीडकरांची चिंता आणखी वाढली आहे. तसेच रुग्णालये देखील पूर्ण भरले असून नवीन रुग्णांना भारती करण्यासाठी खाटा देखील अनेक रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाहीयेत. एकंदरीतच जिल्ह्याला कोरोनाने विळखा घातला आहे हे मात्र निश्चित. सध्या १४७० कोरोना रुग्ण वाढले असून गुरुवारच्या रुग्णांच्या आकड्यांमुळे जरा चिंता वाढली आहे. मात्र४ चांगली बाब अशी की ३४३२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असला तरी जिल्ह्यात कोरोनाचे मीटर थांबायला तयार नाही. गुरुवारी बाधितांचा आकडा १४७० वर गेला असून ३४३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ४२०९ स्वॅब कोरोनाच्या निदानासाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. ४२०९ स्वॅबपैकी ३४३२ अहवाल निगेटिव्ह आले असून १४७० जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आलेत.

जिल्ह्यात लॉकडाऊन कडक पाळला जात नसल्याचे दिसून येत आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला, किराणा दुकानात होणारी गर्दी याला कारणीभूत ठरत आहे. गुरुवारी जिल्ह्यात सर्वात जास्त बीड शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून बीडचा आकडा ३२० इतका आहे. बीड शहर व तालुक्यात हे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. अंबाजोगाई तालुक्यात २१५ कोरोनाबाधित आढळून आलेत, तर आष्टी १३३, बीड ३२०, धारूर ८४, केज १३१, गेवराई २००, माजलगाव ५२, परळी ११९, पाटोदा ७५, शिरूर कासार ८५, वडवणी ५६ असे रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारच्या आकड्यांनी जिल्हावासीयांची चिंता वाढवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!