Share

मोठी बातमी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांचा राजीनामा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी राजीनामा दिला आहे. ऑगस्ट २०१८ पासून ते शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर चेतन तुपे यांनी राजीनामा देत अन्य व्यक्तीला कामात संधी मिळावी अशी मागणी पक्षाकडे केली होती. मात्र त्यानंतर दिड वर्ष हा निर्णय लांबणीवर पडला होता.

पुण्यात राष्ट्रवादीची ताकद असताना २०१७ मध्ये मोदी लाटेत भाजपने मोठा विजय मिळवत राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला होता. आता पुणे महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना पुन्हा एकदा पुण्याचे कारभारी होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली ताकद पणाल लावली आहे. त्यासाठी त्यांनी पक्षात काही संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

२०१७ साली पालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तेत असलेला राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकांवर बसला. गेल्या पाच वर्षात भाजपाला प्रकल्प आणि विकासमकामे पूर्ण करण्यात आलेले अपयश पाहता राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत येण्याची संधी असल्याचे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. शहराध्यक्ष बदलण्यात आल्यानंतर संघटनात्मक पातळीवर महत्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्याचा हा प्रयत्न आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!