Share

वाढदिवस विशेष: ‘हिटमॅन’चे हे विक्रम मोडणे केवळ अशक्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सलामीवीर रोहित शर्माचा आज ३० एप्रिल रोजी ३४वा वाढदिवस. रोहित शर्मा सध्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करत आहे. रोहितचे चाहते त्याला ‘हिटमॅन’ म्हणतात. रोहित शर्माचा विवाह रीतिका सचदेहसोबत २०१५ मध्ये झाला आहे. त्यांना एक गोंडस मुलगीदेखील आहे.

रोहित शर्मा हा असा क्रिकेटपटू आहे ज्याचे विक्रम मोडणे केवळ अशक्या आहे. पहिला विक्रम आहे एकदिवसीय सामन्यातील द्विशतकाचा. रोहितने एकदिवसीय सामन्यात तब्बल तीन द्विशतक झळकावली आहे. हा विक्रम मोडणे जवळपास अशक्यच आहे. दुसरा विक्रम एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचा, रोहितने आपले दुसरे द्विशतक हे श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे झळकावले होते. यावेळी त्याने तब्बल ३३ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने २६४ धावांची खेळी केली होती. हा विक्रम मोडणे अशक्य आहे. कारण एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूना २४० धावाचाही टप्पा ओलांडता आला नाही.

रोहितचा तिसरा विक्रम हा एकाच विश्वचषकात ५ शतके झळकावण्याचा आहे. हा विक्रमही अबाधीत मानला जात आहे. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका या संघाविरुद्ध शतके करत स्पर्धेत ६४८ धावा केल्या होत्या. तर अतंरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वाधिक चार शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. आणि शेवटचा विक्रम हा आयपीएल स्पर्धेतील विजेतेपदाचा आहे. रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६ अंतिम सामने खेळला आहे. यापैकी सर्व सामने जिंकला आहे. यातील एक सामना डेक्कन चार्जर्सकडुन खेळला तर इतर सामने हे मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. यात कर्णधार म्हणून रोहितने आयपीएलमध्ये पाच वेळा विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!