🕒 1 min read
दिल्ली : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स संघावर ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. राजस्थानने १७२ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने ३ गडी गमावत एकोणीसाव्या षटकात पार केले. मुंबईचा सलामीवीर क्विटंन डिकॉकला ७० धावांसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
नाणेफेक गमावल्यानंतर राजस्थानच्या सलामीवीरांनी संघाला अर्धशतकी सलामी मिळवुन दिली. जोस बटलर(४१) बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वालने(३२) कर्णधार सॅमसन(४२) सोबत डाव सावरला. जैस्वाल बाद झाल्यानंतर शिवम दुबे(३५) आणि संजु सॅमसन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. निर्धारीत २० षटकात राजस्थानच्या संघाने ४ गडी गमावत १७१ धावापर्यंत मजल मारली. कर्णधार संजु सॅमसनने राजस्थानकडून सर्वाधिक २७ चेंडुत ५ चौकारासह ४२ धावांची खेळी केली.
Match 24. It's all over! Mumbai Indians won by 7 wickets https://t.co/iO745uIzOg #MIvRR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2021
राजस्थानच्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कराताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. सहाव्या षटकातच ४९ धावा फलकावर लागल्या. कर्णधार रोहित शर्मा(१४) आणि सुर्यकुमार यादव(१६) दोघे ठरावीक अंतराने बाद झाल्यानंतर सलामीवीर क्विटंन डिकॉक(७०) आणि कृणाल पांड्या(३९) यांनी ६३ धावांची भागिदारी करत मुंबईचा विजय निश्चीत केला. कृणाल बाद झाल्यानंतर पोलार्ड(१६) आणि डिकॉक यांनी नाबाद भागिदारी करत मुंबईच्या संघाला विजयी केले. मुंबईकडून सलामीवीर क्विटंन डिकॉकने सर्वाधिक ५० चेंडुत ६ चौकार आणि २ षटकारासह नाबाद ७० धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- बजाजनगरात उघड्या घरातून ऐवज लंपास
- वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, विविध भागातून चार दुचाकी लंपास
- खंडणीसाठी व्यापाऱ्यास मारहाण करून २ लाख रूपये लांबवले
- नगर परिषद कर्मचारी करणार एक मे पासून कामबंद आंदोलन
- कोरोना लसीकरणाला वेग येताच पैठणमध्ये लसीचा तुटवडा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
