औरंगाबाद : कोरोना लसीकरणाचे महत्व कळताच नागरीकांनी लसीकरणासाठी शहरातील लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे, माञ लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या तीन दिवसापासुन शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद आहे त्याची सुचना नागरीकांना नसल्यामुळे लोकांना लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहे.
प्रारंभी कोरोना लसीकरणाबाबत नागरीकांच्या मनात अनेक शंका कुशंका होत्या, म्हणुन प्रशासनाने प्रारंभी फ्रंट लाईन वर्कर व आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना लसी देऊन नागरीकांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला माञ पाहीजे तितके यश आले नाही.
ज्यावेळी माध्यमांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लसीकरण झालेले रुग्ण कसे तरले हे दाखवले असता, नागरीकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करण्यास सुरवात केली, त्यामुळे पैठण शहरात एक ऐवजी तीन लसीकरण केंद्र सुरु करावे लागले आहे, तरी गर्दी वाढत असल्याने उत्पादन कमी खर्च जास्त या न्यायाने लसीचा तुटवडा जानवु लागला आहे.
शहरात मंगळवारी दुपार पासुन लसीचा तुटवडा जानवत आहे, आजचा चौथा दिवस आहे, तालुक्यात लस नाही, त्यात आरोग्य विभागाने लस संपल्याच्या सुचना लसीकरण केंद्रावर न लावल्याने नागरीक आपआल्या भागातील लसीकरण केंद्रावर चकरा मारत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात अकराव्या दिवशी रेकॉर्ड तुटला; कोरोनामुक्तांपेक्षा कोरोनाबाधितांची संख्या अधिक !
- औरंगाबादेत जगण्याच्या विवंचनेत सापडलेले मनपा कर्मचारी साजरा करणार ‘आर्थिक शोषण दिन’!
- पुरेशा लससाठ्या अभावी उद्यापासून तीन दिवस मुंबईत लसीकरण बंद
- परभणी जिल्ह्यात गुरूवारी १२६५ जण कोरोना बाधित; २१ रुग्णांचा मृत्यू
- नगरसेवकांनी तारतम्य ठेवणं गरजेचं; मनसे नगरसेवकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाघ यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
