औरंगाबाद : कन्नड नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटना यांनी नगर परिषद व नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सर्व कर्मचारी अत्यावश्यक सेवेसह राज्यव्यापी काम बंद आंदोलन घोषित केलेल्या १ मे कामगार दिनापासून कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे . महाराष्ट्र राज्य नगर परिषद संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्हाध्यक्ष हरिदास वाघ, उपाध्यक्ष सलीम जहागीरदार, सुरेश दानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन होणार आहे .
संघटनेच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ एप्रिल रोजी काळ्या फिती लाऊन निषेध नोंदवला , १५ एप्रिल रोजी एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन करून ही संघटनेच्या विविध मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने १ मे कामगार दीनापासून ध्वजारोहण झाल्यानंतर काम बंद आंदोलन करणार आहेत यामुळे पाणी पुरवठा कर्मचारी , कोविड सेंटर वर काम करीत असलेले कर्मचारी ही यात सहभागी होणार आहेत
यावेळी मुकुंद महाजन , राजेश मानकर , रुस्तुम फुलारे , जयपाल सिसोदिया , नारायण कनगरे , भाऊसाहेब राऊत , जितेंद्र बोचरे , भीमा नावगिरे , बाळासाहेब चव्हाण , प्रशांत लाडे , शेख खालिद , प्रशांत देशपांडे , प्रमोद निकाळे , ईश्वर शिमरे , अशोक पगारे , अश्विन गोजरे , राजेश जंजाळ , भराड आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात अकराव्या दिवशी रेकॉर्ड तुटला; कोरोनामुक्तांपेक्षा कोरोनाबाधितांची संख्या अधिक !
- औरंगाबादेत जगण्याच्या विवंचनेत सापडलेले मनपा कर्मचारी साजरा करणार ‘आर्थिक शोषण दिन’!
- पुरेशा लससाठ्या अभावी उद्यापासून तीन दिवस मुंबईत लसीकरण बंद
- परभणी जिल्ह्यात गुरूवारी १२६५ जण कोरोना बाधित; २१ रुग्णांचा मृत्यू
- नगरसेवकांनी तारतम्य ठेवणं गरजेचं; मनसे नगरसेवकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाघ यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
