Share

बजाजनगरात उघड्या घरातून ऐवज लंपास

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : एमआयडीसी वाळूज परिसरातील बजाजनगर येथील जागृत हनुमान मंदिराजवळ राहणारे बाबूराव विठ्ठल नरवडे (वय ३०) यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधुन घरात शिरले.

चोरट्याने कपाटातील सोने-चांदीचे दागीने व रोख रक्कम १५ हजार रूपये चोरून नेली. ही घटना २६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाबूराव नरवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत माहेरी गेलेल्या सुनेला आणण्यासाठी गेलेल्या जावयासह सासूला चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच मुलीला घेण्यासाठी परत आल्यास जीवे मारून टाकु अशी धमकी दिली.

ही घटना २७ एप्रिल रोजी दौलताबाद परिसरातील एचटुओ वॉटरपार्क जवळ घडली. याप्रकरणी गिरजाराम भागाजी जमधडे, संतोष गिरजाराम जमधडे, दोघे रा.एचटुओ वॉटरपार्क जवळ, सुनिल उत्तम जाधव आणि त्यांच्या साथीदार महिलेविरूध्द दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!