औरंंगाबाद : वाहन चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून पाच दुचाकी लंपास केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात वाहन चोरीचे सत्र वाढल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिमी सॅमुअल खाजेकर (वय ३१, रा.बिल्डर हौसींग सोसायटी, धनलक्ष्मी अपार्टमेंन्ट, नंदनवन कॉलनी) यांची दुचाकी क्रमांक (जीजे-०१-डीएम-३२६९) चोरट्याने २७ एप्रिलच्या रात्री घराजवळून चोरून नेली. विजय प्रभाकर जाधव (वय ४४, रा.पुजा अपार्टमेंन्ट, संगीता कॉलनी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-१९-एएस-८३०४) चोरट्याने २६ एप्रिलच्या रात्री घराजवळून चोरून नेली.
योगेश लाला परदेशी (वय २५, रा.मोहलाई,सोयगाव) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-१९-एयू-५५९३) चोरट्याने २७ एप्रिल रोजी वॅâन्सर हॉस्पीटलच्या पार्कींगमधुन चोरून नेली. राजेश हरिचंद येडे (वय ३६, रा.शिवनेरी अपार्टमेंन्ट, खडकेश्वर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-३५-डब्ल्यू-४३७२) चोरटयाने २६ एप्रिल रोजी घराजवळून चोरून नेली. विविध भागातून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे छावणी-२, सिटीचौक आणि क्रांतीचौक पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ या प्रमाणे ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात अकराव्या दिवशी रेकॉर्ड तुटला; कोरोनामुक्तांपेक्षा कोरोनाबाधितांची संख्या अधिक !
- औरंगाबादेत जगण्याच्या विवंचनेत सापडलेले मनपा कर्मचारी साजरा करणार ‘आर्थिक शोषण दिन’!
- पुरेशा लससाठ्या अभावी उद्यापासून तीन दिवस मुंबईत लसीकरण बंद
- परभणी जिल्ह्यात गुरूवारी १२६५ जण कोरोना बाधित; २१ रुग्णांचा मृत्यू
- नगरसेवकांनी तारतम्य ठेवणं गरजेचं; मनसे नगरसेवकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाघ यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

